अमोल कोल्हेंचा शिवाजीराव आढळराव पाटलांना वाकून नमस्कार; पाहा फोटो…

NCP Amol Kolhe and Shivajirao Adhalrao Patil Meet at Shivneri Fort : खासदार अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात भेट झाली. किल्ले शिवनेरीवर दोघे एकमेकांसमोर आले. यावेळी अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांना वाकून नमस्कार केला. पाहा फोटो...

| Updated on: Mar 28, 2024 | 12:55 PM
महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी खासदार अमोल कोल्हे किल्ले शिवनेरीवर गेले होते. किल्ले शिवनेरीवर आलं की संघर्षाची आणि स्वाभिमानाची प्रेरणा मिळते, असं कोल्हे म्हणाले.

1 / 5
अमोल कोल्हे शिवनेरीवर गेले होते. त्याचवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि महायुतीचे शिरूरमधील संभाव्य उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील शिवनेरीवर आले होते. यावेळी हे दोघे नेते एकमेकांसमोर आले.

2 / 5
अमोल कोल्हे हे शरद पवार गटाकडून लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत. तर अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील लढतील. मागच्यावेळीही हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात लढले होते. आज हे दोघे एकमेकांसमोर आल्यावर त्यांनी हस्तांदोलन केलं.

3 / 5
या दोघांनी एकमेकांशी काहीवेळ बातचित केली. शुभेच्छा दिल्या. यावेळी अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांना वाकून नमस्कार केला. राजकीय विरोधकांची ही भेट, किल्ले शिवनेरीवर दिसलेलं हे दृश्य सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

4 / 5
माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांच्या भेटीवर भाष्य केलं. वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणं, ही आपली संस्कृती आहे. म्हणून आढळराव पाटील यांना नमस्कार केला. ही संस्कृती जपली पाहिजे. त्यांना शुभेच्छा दिल्या, असं अमोल कोल्हे म्हणाले.

5 / 5
Follow us
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.