
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शिवसेना ठाकरेगटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यात भेट झाली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आज आदित्य ठाकरे यांचं आदरातिथ्य करण्याची संधी मिळाली, असं म्हणत केजरीवाल यांनी फोटो शेअर केले आहेत.

या भेटीचं कारणही सांगितलं आहे. देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली, असं केजरीवाल म्हणाले आहेत.

काही दिवसांआधी अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याचा हा फोटो...