गडकरींच्या घराबाहेर राडा, ‘मोदींना सांगा महाराष्ट्राची माफी मागा’, काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं
Congress Protest at Nitin Gadkari Home : लोकसभेत, राज्यसभेत महाराष्ट्राबाबात केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेसनं राज्यभर मोदींचा निषेध केला होता. आज नागपुरात वाद पेटल्याचं यावेळी बघायला मिळालं.
1 / 8
नितीन गडकरी यांच्या घराबाहेर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यावेळी मोठा तणाव पाहायला मिळालाय.
2 / 8
यावेळी भाजप कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांसोबत काही काळ धक्काबुक्की झाली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
3 / 8
नितीन गडकरी यांनी मोदींना आवाहन करावं आणि महाराष्ट्राची माफी मागण्याची मागणी करावी, असं म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्लोबल केलाय.
4 / 8
लोकसभेत, राज्यसभेत महाराष्ट्राबाबात केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेसनं राज्यभर मोदींचा निषेध केला होता. आज नागपुरात वाद पेटल्याचं यावेळी बघायला मिळालं.
5 / 8
भाजप कार्यकर्ते यांचा आक्रमक पवित्रा यावेळी बघायला मिळाला. बॅरिकेट्स काढून कार्यकर्तेंनी पोलिसांना न जुमानता पुढे जाण्याचा प्रयत्न केला.
6 / 8
नितीन गडकरी यांच्या घराबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांआधीच भाजपचे कार्यकर्ते दाखल झाले होते.
7 / 8
दरम्यान, भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर उभे ठाकल्यानंतरत एकच घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाल्याचं दिसून आलंय.
8 / 8
मागच्या पन्नास वर्षात काहीही न केलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन मोडून काढण्यासाठी भाजप कार्यकर्ते तोडीसतोड प्रत्युत्तर देतील असं यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय.