पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन देशांचा दौरा केला. जपानमधील हिरोशिमा शहरात झालेल्या G7 शिखर परिषदेलाही त्यांनी हजेरी लावली.
तीन देशांचा दौरा करून आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यावर भाष्य केलंय. हा दौरा महत्वपूर्ण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
जेव्हा मी बोलतो तेव्हा जगभरातील लोकांना वाटतं की. भारताची 140 कोटी जनता बोलते आहे. माझ्याकडे जितका वेळ होता तितका वेळ मी देशाबद्दल बोललो, असं नरेंद्र मोदी म्हणालेत.
जेव्हा मी ऑस्ट्रेलियात होतो. तिथल्या कार्यक्रमात माजी पंतप्रधान होते. विरोधी पक्षातील नेते होते. हे यश मोदींचं नाही तर भारताच्या पुरुषार्थाचं आहे. 140 कोटी जनतेचं आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणालेत.
हिंमतीने बोललं पाहिजे. जग ऐकायला आतूर आहे. जेव्हा मी म्हटलं की आपल्या तीर्थ क्षेत्रांवर हल्ले होत आहेत, जर तेव्हा जगभरातील देश मला माझ्यासोबत असल्याचं दिसलं, असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.