महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर महाकराष्ट्रभर संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे.
मुंबईतील बेस्ट बसवर कर्नाटक सरकारची जाहिरात असणारा फोटो रोहित पवार यांनी ट्विट केला आहे.
कर्नाटकच्या लोकांना विरोध नाही. परंतु सीमा भागातील मराठी भाषिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता. सीमाप्रश्नावरून मराठी अस्मिता दुखावण्याचं व महाराष्ट्राला आव्हान देण्याचं कर्नाटक सरकारचं धोरण बघता मुंबईत अशा जाहिराती बघितल्यावर नक्कीच खंत वाटते, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
आपल्या सरकारने या जाहिरातीवर विचार करायला हवा, असंही रोहित पवार म्हणालेत.
सीमाप्रश्न चिघळलेला असताना रोहित पवार यांनी काल बेळगावमध्ये जात मराठी बांधवांची भेट घेतली. त्यानंतर आता त्यांनी कर्नाटक सरकारच्या जाहिरातीचे फोटो शेअर केलेत.