Bipin Rawat : बिपीन रावत यांच्याकडून छत्रपती ताराराणींच्या इतिहासाची आपुलकीनं विचारणा, संभाजी छत्रपतींनी जागवल्या आठवणी
जनरल बिपीन रावत हे आता आपल्यामधून निघून गेलेले आहेत. माझ्यासाठी आणि ही देशासाठी मोठी हानी आहे. माझे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, असं संभाजी छत्रपती म्हणाले.
1 / 8
जनरल बिपीन रावत हे आता आपल्यामधून निघून गेलेले आहेत. माझ्यासाठी आणि ही देशासाठी मोठी हानी आहे. माझे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, असं संभाजी छत्रपती म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तीन वर्षा अगोदर व्यापक स्वरुपात दिल्लीत साजरी व्हावी म्हणून मी त्यांना भेटायला गेलो होतो. मी त्यांना सांगितलं की शिवाजी महाराजांचं युद्ध तंत्र पाहिलं तर पाहुणे राष्ट्रपती, लष्कर प्रमुख आणि नौदल प्रमुख असावेत, असं मी त्यांना सांगितलं. त्यांनी त्वरीत येतो म्हणून सांगितलं. मी त्यांना थँक्यू म्हणून निघालो होतो. निघताना ते मला म्हणाले की छत्रपतीजी थोडा वेळ आहे का? सामान्यत: लष्कर प्रमुख दर्जाचे अधिकारी असं म्हणत नाहीत.त्यांनी सांगितल्यावर मी थांबलो असं, संभाजी छत्रपती म्हणाले.
2 / 8
ते शिवाजी महाराजांचे अनेक विषय मांडत होते. ते माझ्यासाठी मैत्री करण्याचं निमित्त होतं. बिपीन रावत यांच्याशी मी भेटलो त्यावेळी त्यांना मला आम्ही शिवाजी महाराजांच्या आचारानं विचारानं काम करतो हे दाखवून द्यायचं होतं. मी जेव्हा निर्णय घेतो तेव्हा मागं जात नाही, असं ते म्हणाले. हीच शिवाजी महाराजांची युद्ध निती होती. बिपीन रावत यांच्यावर शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणं चालणारे संस्कार होते, असं संभाजी छत्रपती म्हणाले. बिपीन रावत दिल्ली घरी आले होते त्यावेळी त्यांनी छत्रपती ताराराणी यांचा फोटो पाहिला. ताराराणींचा फोटो पाहिला त्यावेळी त्यांनी या कोणं आहेत असं विचारलं? मी त्यांना ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून आहेत. तारारणी यांनी औरंगजेबाशी शेवटचा लढा दिला आणि औरंगजेबाचा मृत्यू झाला.
3 / 8
हे ऐकल्यावर बिपीन रावत अशा महिला सेनानी देशात तयार व्हायला हव्यात, असं म्हटल्याची आठवण छत्रती संभाजी यांनी सांगितली. बिपीन रावत यांनी ताराराणी यांच्या प्रतिमेसोबत फोटो काढून घ्यायचा असल्याचं सांगितलं आणि तो फोटो घेतला, असं संभाजी छत्रपती म्हणाले. तो माझ्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त कॉफी बुक काढलं त्यात तो उल्लेख केला आहे.
4 / 8
राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांना फेटा बांधण्यात येणार असल्याचं त्यांना सांगितलं होतं. शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यास येतो त्यावेळी बिपीन रावत हे स्वत: फेटा बांधून आले होते. बिपीन रावत यांनी महाराष्ट्रीयन पद्धतीनं फेटा बांधला होता. ते स्वत: फेटा बांधून आले होते, असं संभाजी छत्रपती म्हणाले.
5 / 8
छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी त्यांच्याशी संपर्क करायचो. राष्ट्रपतींनी आम्ही येतो सांगितलं होतं. त्यावेळी परवानग्या आणि इतर गोष्टीसांठी मी मनोज नरवणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर बिपीन रावत यांना मेसेज केला होता, असं संभाजी छत्रपती म्हणाले.
6 / 8
जनरल बिपीन रावत हे थलसेना प्रमुख असताना ऑक्टोबर 2018 मध्ये कोल्हापूर येथे 109 मराठा लाइट इन्फंट्री प्रादेशिक बटालियनच्या कार्यक्रमास आले होते. यावेळी छत्रपतींचे निवासस्थान असलेल्या नवीन राजवाड्यास अत्यंत आपुलकीने भेट देऊन स्नेहभोजन केले होते.
7 / 8
जनरल बिपीन रावत हे थलसेना प्रमुख असताना ऑक्टोबर 2018 मध्ये कोल्हापूर येथे 109 मराठा लाइट इन्फंट्री प्रादेशिक बटालियनच्या कार्यक्रमास आले होते. यावेळी छत्रपतींचे निवासस्थान असलेल्या नवीन राजवाड्यास भेट देत राजघराण्यातील जेष्ठ व्यक्तींसोबत फोटो काढला होता. त्यावेळची एक आठवण
8 / 8
गेल्या दोन वर्षापूर्वी कोल्हापूर आणि सांगलीला पूर आला होता त्यावेळी मी त्यांना कॅन आय वॉंट टू अर्जंटली, असा मेसेज केला. बिपीन रावत यांनी स्वत: फोन करुन माहिती दिली. एका तासात यंत्रणा हलली. कोल्हापूर आणि सांगलीकरांना एनडीआरएफच्या तुकड्या मिळाल्या होत्या, असं संभाजी छत्रपती म्हणाले.