
शिंदे गटाचे फायरब्रॅन्ड नेते शहाजीबापू पाटील यांनी 8 दिवसात 9 किलो वजन कमी केलं आहे.

मागील दहा दिवसांपासून शहाजीबापू पाटील बंगळुरुमध्ये मुक्कामी होते. तिथे त्यांनी उपचार घेतले.

श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमामध्ये त्यांनी उपचार घेतले. पंचकर्मच्या माध्यमातून त्यांनी 9 किलो वजन कमी केलं आहे.

या उपचारानंतर शहाजीबापू आज सांगोल्यात परतणार आहेत. त्यामुळे शहाजीबापू आता नव्या रूपात पाहायला मिळतील.

शिंदेगटाच्या बंडावेळी 'काय झाडी, काय डोंगर' हा त्यांचा डायलॉग प्रसिद्ध झाला होता. आता त्यांच्या या फिटनेसची जोरदार चर्चा होतेय.