राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार यांचे पुतणे श्रीनिवास पवार यांच्या कन्येचा नुकताच विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला पवारांनी हजेरी लावली होती.
श्रीनिवास पवार यांची कन्या मिथिला पवार यांच्या विवाहातील काही खास फोटो पाहायला मिळत आहेत
मिथिला पवार यांचा विवाह बंगळुरुमधील उद्योगपती करण विरवाणी यांच्याशी झाला. या सोहळ्याला पवार कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
मिथिला पवार आणि करण विरवाणी यांचा विवाह अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत बंगळुरुमध्ये पार पडला.
उपमुख्यमंत्री अजित पवारही आपल्या सख्ख्या पुतणीच्या लग्नाला सपत्नीक हजर होते. सुप्रिया सुळे यांनी दादा अजित पवार आणि वहिनी सुनेत्रा पवार यांचा फोटो शेअर करत, आनंदी राहा, असं लिहिलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी भाचीच्या विवाहाचे फोटो फोटो शेअर करत नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले आहेत.
शरद पवार यांचा कुटुंब कबिला फार मोठा आहे. कुठल्याही सणवार किंवा कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने पवार कुटुंब जेव्हा एकत्र भेटतं, तेव्हा जल्लोष पाहायला मिळतो. या सोहळ्यांचे फोटो सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेतात