खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी आणि मुलगा रुद्रांशही सोबत होता.
रुद्रांश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काहीच मिनिटात चांगली गट्टी जमली.
यावेळी रुद्रांश आणि पंतप्रधान मोदी यांनी एकमेकांना हाय फाइव्ह दिलं.
या भेटीनंतर श्रीकांत शिंदे यांनी फेसबुक पोस्ट लिहिली.
जीवनाचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर मुलांमध्ये मिसळावे,त्यांच्या भावनांशी एकरूप व्हावे”असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात. जेव्हाजेव्हा बालकांच्या सहवासाची संधी मिळते तेव्हा ते स्वतःलाही विसरतात. आजही असंच झालं! पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली, असं कॅप्शन श्रीकांत यांनी फोटोंना दिलं.