Photos | कोरोनाच्या संकटातही जनतेच्या प्रश्नांना आवाज, टीव्ही 9 च्या पत्रकारांचा विशेष सन्मान
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत कोरोना वॉरियर ठरलेल्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये टीव्ही 9 मराठीच्या दोन पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
Follow us
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत कोरोना वॉरियर ठरलेल्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये टीव्ही 9 मराठीच्या दोन पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
यात टीव्ही 9 मराठीचे ज्येष्ठ पत्रकार दिनेश दुखंडे आणि विनायक डावरुंग यांचा समावेश आहे. त्यांनी कोरोना संकटाच्या काळातही आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या प्रश्नांना आवाज दिला. त्यामुळेच त्यांची ही दखल घेण्यात आली.
राज्यातील पत्रकारांचे लेख, कविता यांचं दरवर्षी न्यूजरूम लाईव्ह दिवाळी अंकाच्या माध्यमातून प्रकाशन केलं जातं.
यंदा या दिवाळी अंकाचं प्रकाशन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आलं. यासमवेत कोरोना काळात काम करणाऱ्या पत्रकारांचा सुद्धा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.