अभिनेत्री पूनम पांडे आता नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे. यावेळी चक्क पूनम विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
गोव्यातील चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडीओचे चित्रीकरण केल्याने हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला शाखेने पूनम पांडे विरोधात गोव्यातील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या एफआयआरमुळे पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
लग्नानंतर गोव्याला गेलेली पूनम पांडे नुकतीच मुंबईत परतली आहे. पूनम पांडेचा सदर व्हिडीओ चित्रित करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आयपीसीच्या कलम 294 अन्वये पूनम पांडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.