काही महिन्यांपूर्वीच तिनं आपल्याला भाची झाली असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सांगितलं होतं. त्या लहान बाळाचे फोटोसुद्धा तिनं शेअर केले होते.
प्राजक्ता आता परत आत्या झाली आहे. या चिमुकलीचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला आहे. त्यामुळे आता प्राजक्तानं चाहत्यांना या चिमुकलीचं नाव एका स्पेशल पोस्टद्वारे सांगितलं आहे.
'चला...आता माझं social media attention खाऊन टाकायला (‘गोबरे गाल’ परंपरा जपणारी) माझी दुसरी भाचीही सज्ज झाली ?, शिवप्रिया ♥️#भाची' असं कॅप्शन देत प्राजक्तानं ही पोस्ट शेअर केली आहे.
या फोटोमध्ये प्राजक्तानं मराठमोळी साडी परिधान केली आहे. सोबत तिनं ऑक्सिडाइझ ज्वेलरी कॅरी केली आहे. या लूकमध्ये प्राजक्ता सुंदर दिसतेय.