नेहमीच प्रसन्न राहणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या विविध मूड्सचे फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.
निखळ हास्य... सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे देशभरात प्रार्थनाचे अनेक चाहते आहेत.
प्रार्थनाला झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' 'व्हॉट्स अप लग्न' या चित्रपटांमध्ये तिनं कमालीचा अभिनय केला आहे.
प्रार्थनाचं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे.या काळ्या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्यासुद्धा पसंतीस उतरले आहेत.