वाशिम शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी मान्सूनपूर्व रिमझिम पाऊस सुरु झाला आहे. मालेगावसह जउल्का परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आत पुणे आणि परिसरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लागली. पुणे जिल्ह्यातील काही भागात गडगडाटासह पाऊस झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी बरसल्या. पावसाच्या सरींमुळे हवेत चांगलाच गारवा जाणवला.
मनमाड शहर आणि परिसरात दुसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
गडचिरोली जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. कोरची तालुक्यात अनेकांच्या घरांवरील छत, पत्रे उडून गेले. तसंच साठवणूक केलेल्या अन्नधान्याचीही मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं.