पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदीनी आईच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त त्यांची खास गांधीनगर येथील घरी जाऊन भेट घेतली. त्यांनी काही वेळ आपल्या आईसोबत घालवला
पंतप्रधान मोदी यांच्या आईने हिराबेन मोदी यांनी वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण केलं आहे याच औचित्य साधत .त्यांनी काही वेळ आपल्या आई सोबत घालवला.
पंतप्रधान मोदीनी वाढदिवसानिमित्त आपल्या आईचे पाय धुवत त्यांची पूजा केली व वाढदिवसाच्या शुभेच्छा ही दिल्या. तसेच त्याचे आशीर्वादही घेतले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आईला मिठाई भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. आईसोबत राहत्या घरी वेळ घालवल्यानंतर मदी पुढील दौऱ्यास रवाना झाले