नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
छान छान फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहणे प्रियाला पसंत आहे.
आता प्रियानं काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
लाल आणि पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात प्रियानं हे नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
एवढंच नाही तर प्रियानं एक व्हिडीओसुद्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘पॉरी हो रही हैं’ असा तो ट्रेंडिग व्हिडीओ तिनं तयार करत सोशल मीडियावर शेअर केला आहे.