प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. प्रियांका चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सध्या पती आणि मुलीसोबत धमाल करताना प्रियांका चोप्रा दिसतंय.
प्रियांका चोप्रा हिने काही खास फोटो हे इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी कुटुंबासोबत चांगला वेळ घालवताना प्रियांका चोप्रा ही दिसत आहे.
प्रियांका चोप्रा हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, तिने निक जोनस याच्या खांद्यावर डोके ठेवले आहे. दुसऱ्या फोटोमध्ये मुलीसोबत मस्ती करताना प्रियांका दिसत आहे.
बिचवरचे फोटो देखील प्रियांका चोप्रा हिने शेअर केले आहेत. प्रियांका चोप्रा हिने शेअर केलेले हे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.
प्रियांका चोप्रा ही गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूडच्या चित्रपटांपासून तशी दूर आहे. मात्र, असे असतानाही प्रियांका चोप्रा ही चाहत्यांच्या संपर्कात कायमच असते.