सध्या हापूस आंब्याचे दर अधिक असल्यामुळे अनेकांना आंबे खाता येत नाहीत. सामान्य माणसांनी सुध्दा आंबे खावेत यासाठी पुण्यातील व्यापाऱ्याने आंबे खा आणि नंतर हप्ते भरा असा नवा फंडा उपलब्ध केला आहे. त्यामुळे याची सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.
भारतातल्या हापूस आंब्यांना परेदशात अधिक मागणी आहे. देशात अनेक ठिकाणी आंबे पोहोचले देखील आहेत. हापूस आंबा हा चवीला चांगला असल्यामुळे त्याची मागणी अधिक आहे. पण पुण्यातील एका विक्रेत्याने आंबे हप्त्यावर विकायला सुरुवात केली आहे. त्यासाठी काही नियम अटी घातल्या आहेत.
कोरोनाच्या काळानंतर आंबे खरेदी करताना सामान्य नागरिक दिसत नाही. त्यांनी हप्त्यावर आंबे खरेदी करावे अशी नवी योजना आहे. क्रेडिट कार्ड आणि डेबिटद्वारे ते ईएमआयवर मिळवू शकतात. दुकानात आंब्याची किंमत 600-1300 रुपये प्रति डझन दरम्यान आहे अशी माहिती गौरव सणस या आंबे विक्रेत्यांनी दिली.
मागच्या तीन वर्षात लोकांनी आंबे खरेदीकडे पाठ फिरवली असल्यामुळे विक्रेत्यांनी हा नवा फंडा बाजारात आणला आहे.