आता अनलॉकमध्ये मालिकांचं आणि चित्रपटांचं शूटिंग सुरू झालं आहेत. त्यामुळे तुमचे लाडके कलाकारही कामाला लागलेत.
अशात एक विनोदी कार्यक्रम सगळ्यांचं लक्ष वेधतोय. या कार्यक्रमाचं नाव आहे 'कॉमेडी बिमेडी' . या कार्यक्रमात तुमच्यासाठी आहे विनोदाची मेजवानी.
'कॉमेडी बिमेडी' हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांना चांगलाच खळखळून हसवतोय.
आता या कार्यक्रमाला आणखी मजेदार बनवण्यासाठी कार्यक्रमात पोहोचले आहेत अभिनेते पुष्कर श्रोत्री.
या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालकाचीही चांगलीच चर्चात आहे. मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. तिचे चाहते तिला नव्या भूमिकेत बघून प्रचंड खूश आहेत.
स्मिता सुत्रसंचालनाची धुरा पहिल्यांदाच सांभाळतं आहे. ती नेहमीच या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.