Photo Gallery : राज्यात पावसाचा हाहाकार, चोहीकडे पाणीच-पाणी
मुंबई : यंदा वेळेपूर्वी आगमन होऊनही राज्यात पाऊस सक्रीय झाला नव्हता. आतापर्यंत केवळ कोकण आणि मुंबईत बरसणाऱ्या पावसाने आता राज्य व्यापले आहे. हंगामात प्रथमच सर्वत्र पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरणी झालेल्या पिकांना तर नवसंजीवनी मिळणार आहेच पण ज्या क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या होत्या त्याला देखील गती येणार आहे. यंदा सरासरीएवढा पाऊस होणार असल्याचा अंदाज होता पण प्रत्यक्षात पावसाला सुरवातच झाली नसल्याने चिंता व्यक्त केली जात होती. अखेर राज्यातील चारही विभागात पावसाने हजेरी लावली आहे. असे असले तरी कोकण, मुंबई आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे.
Most Read Stories