अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. आपल्या व्यावसायिक आयुष्यातील अपडेट सोशल मीडियावर टाकत असते.
सईने या सगळ्या बिझी शेड्युलमधून ती स्वतःसाठी वेळ काढत सहलीचे नियोजन करताना दिसते. नुकतेच व्यस्त वेळातून सई पावसाचा आनंद लुटला आहे.
दाट धुक्यात, पावासात भिजण्याचा आनंद घेतानाचे फोटो आपल्या सोशलमीडियावर शेअर केले आहेत . तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे .
MOOD असे कॅप्शन देत तिने हे दोतो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सईने निळ्या रंगाचा रेनकोट परिधान केला आहे.
व्यावसायिक पातळीवर सईचा काही दिवसांपूर्वीच ‘मिडियम स्पायसी’ चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच काही ती काही हिंदी चित्रपटच्या प्रोजेक्ट्सवर कामा करत आहे.