Rajarshri Shahu Maharaj : प्रजाहितदक्ष राजाला अभिवादन करण्यासाठी अवघी कोल्हापूर नगरी लोटली…
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतीदिन आहे. कोल्हापुरात तर आज अगदी जल्लोषाचं वातावरण आहे. शाहू महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अवघी कोल्हापूर नगरी लोटल्याचं पाहायला मिळालं.

Image Credit source: TV9
- सामाजिक न्यायाचा अर्थ आपल्या कृतीतून समाजासमोर मांडणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यांच्या या स्मृती शताब्दीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
- कोल्हापुरात तर आज अगदी जल्लोषाचं वातावरण आहे. शाहू महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अवघी कोल्हापूर नगरी लोटल्याचं पाहायला मिळालं.
- यावेळी राजर्षी खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री हसन मुश्रीफ आदी मान्यवर उपस्थित होते.
- आज सकाळी दहा वाजता 100 सेकंद स्तब्ध राहून शाहू महाराजांना मानवंदना देण्यात आली. राज्यभरात हा उपक्रम राबवण्यात आला.
- संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या फेसबुकला फोटो शेअर करून शाहू महाराजांना अभिवादन केल्याचं सांगितलं. “राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त नवीन राजवाड्यातील महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले”, असं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.