रक्षा बंधनाच्या निमित्ताने मुंबईतील परिचारिकांनी मातोश्रीवर येवून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना राखी बाधली.
सायन रुग्णालयात, केईएम रुग्णालय, पूर्व उपनगरातील आणि पश्चिम उपनगरातील रुग्णालयात या परिचारिका कार्यरत आहेत.
आम्ही कट्टर शिवसैनिक असून आम्ही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना राखी बांधायला आलो असल्याचे या परिचारिकांनी सांगीतले
कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी आम्हाला मदत केली होती त्याबद्दल त्यांचे आभार
उद्धव ठाकरेंच्या रुपात आम्हाला भाऊ मिळाला आहे. त्यांनी आमचे भावाप्रमाणे संरक्षण केले.
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना राखी बांधण्यासाठी आलेल्या या शेकडो परिचारिका म्यूनसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या कर्मचारी आहेत.