
खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलंय.

या वेळी त्या आपल्या लाडक्या दादाला साखर भरवताना दिसून आल्या.

त्यानंतर सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना आरतीचं ताट घेत ओवाळलं. अजित पवारही यावेळी हात जोडलेले दिसून आले.

ओवाळनीनंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पाय पडत आशीर्वादही घेतले. अजित दादाही सुप्रियाताईंना हात जोडताना दिसून आले.

फक्त अजित दादाच नाही तर आपल्या कार्यकर्त्यांसोबतचे रक्षाबंधनचे फोटोही सुप्रिया सुळे यांनी सोळ मीडायावर टाकले आहेत.

राज्यभरातून अनेक कार्यकर्त्यांनी सुप्रियाताईंना रक्षाबंधननिमित्त अनेक भेटवस्तू दिल्या आहेत.