'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतला कोल्हापूरचा रांगडा गडी ‘राणा दा’ साकारुन अभिनेता हार्दिक जोशी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचला.
हार्दिक जोशीने आपल्या सहज-सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे.
हार्दिक जोशी सोशल मीडियावर सतत सक्रीय असतो. अनेक हटके पोस्टमधून तो चाहत्यांचं लक्ष वेधतो.
अलिकडेच राणादाने सोशल मीडियावर त्याचे जबरदस्त स्टायलिश फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या स्टायलिश आऊटफिटमध्ये राणादाचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळतोय.
हार्दिक जोशीच्या या स्टायलिश फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षा केला आहे.