
न्यायदेवता शनिदेव यांनी 29 मार्चला कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. यामुळे राशीचक्राची संपूर्ण गणितं बदलली आहेत. मेष राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. कुंभ आणि मीन राशीवरही साडेसातीचा प्रभाव आहे. तर सिंह आणि धनु राशीचे जातक अडीचकीच्या फेऱ्यात आहेत.

शनिचा प्रभाव असताना त्यातून दिलासा मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. यामुळे साडेसाती आणि अडीचकीत दिलासा मिळतो. त्यामुळे शनिवारी खाली दिलेले उपाय नक्कीच करा.

शनि साडेसती आणि अडीचकीच्या फेऱ्यात दिलासा मिळावा यासाठी शनिवारी काळे तीळ दान करा. तसेच शनिवारी शनिदेवाच्या मूर्तीला तेल अर्पण करावे.

शनिवारी शनिदेवाच्या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे शनि साडेसती आणि अडीचकीचा प्रभाव कमी होतो आणि शनिदेवाचे आशीर्वाद मिळतात.

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी काळ्या कुत्र्याला जेवण द्या. असे केल्याने शनि साडेसती आणि अडीचकीचा प्रभाव कमी होतो असे मानले जाते.

न्यायदेवता शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी गरजूंची सेवा नक्कीच करा. शनिदेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी कावळ्यांना खाऊ घाला. असे केल्याने शुभ फळे मिळतात. (सर्व फोटो- टीव्ही 9 हिंदी)