Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 18 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. कामात मनासारखी प्रगती दिसून येईल. नव्या ग्राहकांसोबत व्यवहार करताना काळजी घ्या. ऑफिसात आपल्या विरोधात षडयंत्र रचलं जाण्याची शक्यता आहे. शुभ अंक 25 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
3 / 10
मानसिक शांतता देणारा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला प्रॉपर्टीचा वाद संपुष्टात येईल. प्रेम प्रकरणात सकारात्मक घडामोडी घडतील. सर्दी खोकल्याची काही तक्रार असेल तर घरगुती प्राथमिक उपचार करा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग हिरवा राहील.
4 / 10
लग्नासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांना योग्य स्थळं चालून येतील. प्रेम प्रकरणात होकार मिळू शकतो. आरोग्य विषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. व्यायाम किंवा योगा करा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
5 / 10
कामाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला जाईल. काही छोट्या समस्या डोकं वर काढतील. पण त्याचं निकारण करण्यास तुम्ही सक्षम असाल. काही नात्यांवर लक्ष देणं गरजेचं आहे. शुभ अंक 15 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
6 / 10
आजचा दिवस संमिश्र राहील. कामाच्या ठिकाणी होत असलेल्या कुरघोडीचा सामना करावा लागू शकतो. बॉसकडून तुम्हाला ओरडा खावा लागेल. काही गोष्टी महाग होऊ शकतात. शुभ अंक 12 आणि शुभ रंग केसरी राहील.
7 / 10
आर्थिक आणि प्रेम प्रकरणासाठी आजचा दिवस चांगला जाईल. पण कौटुंबिक स्तरावर काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वाद होणार याची काळजी घ्या. शुभ अंक 5 आणि शुभ रंग नारंगी राहील.
8 / 10
कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. पण दिवस आनंदात जाईल. तसेच हाती घेतलेली कामं पूर्ण होतील. आर्थिक कोंडी फोडण्यात यश मिळेल. कुटुंबात काही वाद होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पांढरा राहील.
9 / 10
आज भौतिक सुखांची अनुभूती घेता येईल. नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा योग जुळून येईल. घरात आनंदी वातावरण राहील. आरोग्यविषयक तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.
10 / 10
कामाच्या ठिकाणी काही नवीन गोष्टी शिकता येतील. अडचणी येतील पण योग्य मार्गदर्शन लाभल्याने सुटकेचा निश्वास टाकाल. काही तास अतिरिक्त काम करावं लागू शकतं. शुभ अंक 11 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)