Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 13 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आजचा दिवस किचकट जाईल. काही होणारी कामं होणार नाही त्यामुळे चिडचिड होईल. पण प्रयत्न करत राहा. चिकाटी सोडू नका. विनाकारण घरच्यांना त्रास होईल असं वागू नका. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.
3 / 10
तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करा. लोकं लाख बोलतील काही होत नाही. पण सातत्य ठेवलं की अशक्य कामही शक्य होतं. नव्या कामाला सुरुवात करा. आजचा दिवस नव्या सुरुवातीसाठी चांगला आहे. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.
4 / 10
आपल्या कामाचा फायदा दुसऱ्यांना होताना दिसेल. पण त्याचं तुम्ही काहीही करू शकत नाही. धीर धरा आणि काम करत राहा. थोड्याच दिवसात तुम्हाला सकारात्मक बदल दिसेल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
5 / 10
जो काही विचार केला आहे त्यासाठी कठोर परिश्रम करा. आत्मनिर्भर राहून कामं तडीस न्या. अधिक लालसेपोटी मोठं नुकसान होऊ शकतो. काही दिवस फायदा होत नसला तरी काम करत राहा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
आज दिवसभरात एकटेपणा जाणवेल. गरजेची कामं पूर्ण करा आणि सकारात्मक विचाराने पुढे जा. आपल्या चुका या आपल्याच दुरुस्त करणं गरजेचं असतं. नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
7 / 10
कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. काही सल्ले तुमच्या कामी पडतील. अनुभवामुळे नक्कीच फायदा होईल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
घरात सकारात्मक विचार असल्याने वेगळीच अनुभूती मिळेल. नवं काम करण्याची प्रेरणा घरातून मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी झाल्याने आनंद होईल. भावनात्मक दृष्टीकोनातून काही प्रसंग डोळ्यासमोरून जातील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.
9 / 10
घरात काही कारणामुळे तणावाचं वातावरण राहील. शेजाऱ्यांच्या वागण्यामुळे त्रास होईल. पण त्याकडे दुर्लक्ष करून आपलं काम सार्थकी लावा. आपला छंद जोपासण्याचा प्रयत्न करा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.
10 / 10
आज तुमचं पूर्ण लक्ष काम पूर्ण करण्यावर असणार आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून काही कामांची बांधणी करा. जीवनात नकारात्मकता येईल असं वागू नका. काही बदल हे आवश्यक असता हे लक्षात ठेवा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)