Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 27 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
समाजात मानसन्मान वाढल्याची प्रचिती येईल. तुमची काही कामं ओळखीने पूर्ण होतील. मानसिक तणाव दूर होईल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग जांभळा राहील
3 / 10
वाद होईल असं वागू नका. हाती घेतलेल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो. पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ येऊ शकते. शुभ अंक 10 आणि शुभ रंग जांभळा राहील.
4 / 10
कोण आपल्या बाबत काय बोलते याकडे लक्ष देऊ नका. कदाचित लोकांच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. पण त्याकडे दुर्लक्ष करा आणि काम करत राहा. इच्छित रिझल्ट मिळेल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग हिरवा राहील
5 / 10
खर्चात वाढ झाल्याने डोकेदुखी वाढेल. विनाकारण काही कामांसाठी पैसा खर्च करावा लागेल. त्यामुळे ज्या वस्तूंसाठी पैसा जमवला ते घेणं कठीण होईल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
पैसा कमवण्याचे नवे स्त्रोत तयार होतील. पण हाती आलेली संधी सोडू नका. गुप्त शत्रूंकडून त्रास होण्याची शक्यता आहे. मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
7 / 10
दिवसाची सुरुवात एकदम मस्त होईल. एक एक काम मार्गी लागत असल्याने उत्साह वाढेल. गुंतवणून करताना विचारपूर्वक करा. मित्रांकडून चांगलं सहकार्य मिळेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग हिरवा राहील.
8 / 10
आत्मविश्वास दुणावलेला राहील. काही नकारात्मक गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न करा. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. मुलांसोबत प्रेमाने वागा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग नारंगी राहील.
9 / 10
आर्थिक पातळीवर यश मिळताना दिसेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. कौटुंबिक पातळीवर आनंदी वातावरण राहील. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पांढरा राहील.
10 / 10
अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. लग्नासाठी सुरु असलेले प्रयत्नांना यश मिळेल. चांगल्या स्थळाकडून होकार मिळू शकतो. शुभ अंक 1 आणि शुभ रंग सोनेरी राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)