Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 9 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आपल्याला आपली पारख असणं गरजेचं आहे. अनेकदा चुकीच्या लोकांमध्ये राहून तसेच विचार होतात. त्यामुळे चांगल्या लोकांची निवड करा. शुभ अंक 27 आणि शुभ रंग हिरवा राहील.
3 / 10
कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून कुटुंबासाठी वेळ द्या. घरातील कामात मदत करा. तुमच्या अशा वागण्याने घरात सकारात्मक वातावरण राहील. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.
4 / 10
आपण जसा विचार करतो तशाच घडामोडी आपल्यासोबत घडत जातात. त्यामुळे संकटातही सकारात्मक विचार करा. नक्कीच मार्ग सापडेल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग निळा राहील.
5 / 10
मित्रांच्या मदतीने काही किचकट कामं पूर्ण करता येतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. पोटासंबंधी विकार डोकं वर काढण्याची शक्यता आहे. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.
6 / 10
अडचणी कोणासमोर नाहीत. सर्वांना एक ना एक दिवस यातून जावं लागतं. त्यामुळे भविष्याची चिंता आजच करू नका. घरात आनंदी वातावरण ठेवा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग लाल राहील.
7 / 10
कठीण प्रसंगातही जो आपली साथ देतो तो खरा मित्र हे लक्षात ठेवा. अशा मित्रांना सोडू नका. त्यांची साथ कायम ठेवा. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रगती दिसेल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग पिवळा राहील.
8 / 10
नोकरी करणाऱ्या जातकांना आजचा दिवस संमिश्र राहील. काही समस्या सुटतील. तर काही समस्या आ वासून समोर येतील. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
जगात सर्व सोंग करता येतात पण पैशांचं सोंग काही काही करता येत नाही. त्यामुळे दिखाऊबाजीत जाऊ नका. पैशांची बचत करा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
आर्थिक गणित सोडवण्यासाठी काम करणं गरजेचं आहे. आपल्याला बसल्या जागी कोणी पैसा आणून देणार नाही. नोकरीवर अवलंबून राहू नका. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)