Rashid Khan Marriage : राशिद खानसोबत त्याच्या तीन भावंडांच एकाच मांडवात ‘कबूल हैं’ PHOTOS

| Updated on: Oct 04, 2024 | 9:45 AM

Rashid Khan Marriage : राशिद खान अफगाणिस्तान क्रिकेटमधील मोठा सुपरस्टार आहे. टीमसाठी वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याच त्यासं स्वप्न होतं. वनडे वर्ल्ड कप 2023 आधी त्याला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तो बोललेला की, अफगाणिस्तानची टीम वर्ल्ड कप जिंकत नाही, तो पर्यंत तो लग्न करणार नाही. पण त्याने आपला शब्द पाळला नाही.

1 / 5
अफगाणिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटपटू राशिद खान अखेर विवाहाच्या बोहल्यावर चढला आहे. वयाच्या 26 व्या वर्षी त्याने निकाह केला. गुरुवारी 3 ऑक्टोंबरला अफगाणिस्तानची राजधानी पख्तूनमध्ये त्याने रीति-रिवाजाने लग्न केलं.

2 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राशिद खानसोबत त्याच्या तीन भावंडांनी सुद्धा निकाह केला. राशिद खान अफगाणिस्तानच्या T20 टीमचा कॅप्टन आहे. राशिदसोबत त्यांचे तीन भाऊ सुद्धा एकाच दिवशी विवाह बंधनात अडकले.

3 / 5
या लग्नाला अफगाणिस्तान क्रिकेटमधील अनेक खेळाडू उपस्थित होते. काबूलमध्ये झालेल्या या लग्नाचे अनेक फोटो समोर आलेत. राशिदने निकाह करताना आपलं जुन आश्वासन मोडलं.

4 / 5
राशिद खानच लग्न काबुलच्या इम्पेरियल कॉन्टिनेन्टलमध्ये झालं. हॉटेलच्या बाहेर लग्नाच्या आनंदात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. निकाहला येऊन अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटुंनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.

5 / 5
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नसीब खान, टीमचे  सीनियर खेळाडू मोहम्मद नबी, अजमतुल्लाह ओमरजई, नजीबुल्लाह जादरान, रहमत शाह आणि मुजीब उर रहमानसह अनेक युवा खेळाडू लग्नाला उपस्थित होते. अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटुंनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन शुभेच्छा दिल्या.