अभिनेत्री रश्मी देसाई सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. ती नेहमी एकापेक्षा एक फोटोशूट पोस्ट करत आहे.
अभिनेत्री रश्मी देसाईनं ‘ये लम्हे जुदाई के’ या मालिकेतून मालिका क्षेत्रात पाऊल टाकलं होतं.
तर 2006 मध्ये रीलीज झालेल्या रावण या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
रश्मी लवकरच ‘तंदूर’ या वेब सीरीजमध्ये झळकणार आहे.
रश्मीनं भोजपूरी इंडस्ट्रीमध्येसुद्धा आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला. एका भोजपूरी फिटर फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.