Ravindra jadeja IPL 2022: वडिल सिक्युरिटी गार्ड, आई नर्स, रवींद्रने क्रिकेटमधून कमावला अमाप पैसा, आकडा वाचून डोळे विस्फारतील
IPL 2022: टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजासाठी IPL 2022 चा सीजन फारसा चांगला राहिला नाही. त्याने CSK चा कॅप्टन म्हणून सीजनची सुरुवात केली होती. पण मध्यावरच त्याने कॅप्टनशिप पुन्हा एमएस धोनीकडे सोपवली.
1 / 10
टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजासाठी IPL 2022 चा सीजन फारसा चांगला राहिला नाही. त्याने CSK चा कॅप्टन म्हणून सीजनची सुरुवात केली होती. पण मध्यावरच त्याने कॅप्टनशिप पुन्हा एमएस धोनीकडे सोपवली.
2 / 10
कॅप्टनशिपची जबाबदारी आणि त्यातून मुक्तता एवढ्यापुरतीच रवींद्र जाडेजासाठी ही सीजन मर्यादीत नाही. त्याला दुसरे झटकेही बसले आहेत. दुखापतीमुळे तो आयपीएलमधून बाहेर गेलाय.
3 / 10
रवींद्र जाडेजाने आपल्या मेहनतीने फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. रवींद्र जाडेजाने व्यक्तीगत जीवनात संघर्ष केलाय. त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. वडिल जामनगरमध्ये सिक्युरिटी गार्ड होते. आई रुग्णालयात नर्सची नोकरी करायची.
4 / 10
जड्डूच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रवींद्र जाडेजाचा जन्म 6 डिसेंबर 1988 रोजी जामनगरमध्ये झाला. आईला रवींद्रला क्रिकेटपटू बनवायचे होते, तर वडिलांना त्याला लष्करात पाठवायचं होतं. जाडेजाची आई त्याला टीम इंडियाच्या जर्सीत पाहू शकली नाही. 2006 अंडर -19 वर्ल्ड कपच्या एकवर्ष आधी जाडेजाच्या आईचं निधन झालं.
5 / 10
जाडेजाचं बालपण खूप अडचणीत गेलं. पण आज तो कोट्यावधीच्या संपत्तीचा मालक आहे. रिपोर्ट्सनुसार जाडेजाजवळ 97 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
6 / 10
जाडेजा वर्षाला जवळपास 16 कोटी रुपयांची कमाई करतो. त्याच्याकडे ह्यूंडई एक्सेंट, ऑडी क्यू 7 आणि एक बीएमडब्ल्यू एक्स 1 कार आहे.
7 / 10
जाडेजा जामनगरमध्येच राहतो. मोकळ्या वेळेत तो आपल्या फार्महाऊसवर घोडेस्वारीचा आनंद घेताना दिसतो. तलवारबाजी सुद्धा त्याचा शौक आहे.
8 / 10
अनेकदा शतक-अर्धशतक झळकावल्यानंतर तो मैदानावर बॅटीला तलवारीसारख चालवताना दिसतो.
9 / 10
IPL 2008 च्या पहिल्या सीजनमध्ये रवींद्र जाडेजा राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. त्यानंतर एक वर्षाने तो भारतीय संघात दाखल झाला. जाडेजा भारतीय संघात आल्यानंतर त्याने कधीही मागे वळून बघितलं नाही. तो संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू बनला.
10 / 10
ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने 2016 साली रिवाबा जाडेजा बरोबर लग्न केलं. 2019 लोकसभा निवडणुकी दरम्यान रिवाबाने भारतीय राजकारणात पाऊल ठेवलं. ती भारतीय जनता पार्टीची सदस्य आहे. दोघांना एक मुलगी असून तिचं नाव निध्याना आहे.