शाओमी भारतीय बाजारात आपला नवाकोरा रेडमी नोट 12 हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. लाँचिंगची तारीख कंपनीने अधिकृतरित्या जाहीर केली आहे. (Photo - mi.com)
शाओमीचा सब ब्रँड रेडमीनं अधिकृत ट्विटर खात्यावरून माहिती दिली आहे. रेडमी नोट 12 हा स्मार्टफोन 30 मार्च 2023 रोजी लाँच होणार आहे. शाओमीनं यासाठी एक वेगळं पेज तयार केलं आहे. यात फोनचे डिटेल्स देण्यात आले आहेत. (Photo - mi.com)
रेडमी नोट 12 मध्ये 120 हर्ट्स रिफ्रेश रेटसह सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. त्याचबरोबर स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 985 4जी ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. फोनमध्ये 11 जीबीपर्यंत रॅम वाढवता येईल. (Photo - mi.com)
रेडमी नोट 12 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल असणार आहे. मात्र इतर कॅमेऱ्याचे मेगापिक्सलबाबत माहिती नाही. सेल्फी कॅमेऱ्याबाबतही माहिती समोर आलेली नाही. (Photo - mi.com)
रेडमी नोटमध्ये 5000 एमएएचची बॅटरी असेल आणि डिव्हाईस 33 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. (Photo - mi.com)