पैठणी हस्तकला वॉल हँगिंगच्या माध्यमातून शिवरायांची प्रतिकृती, शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अनोख्या पद्धतीने अभिवादन
येवल्यातील पैठणी ही सातासमुद्रापार प्रसिद्ध असून येथील विणकर कारागिर आपली कला पैठणीवर वेगवेगळ्या पद्धतीने साकारत असतात.
अशाच प्रकारे येवल्यातील ओमकार रत्नाकर रोडे या पैठणी विणकर कारागिराने पैठणीचा नवीन वेगळा प्रकार वॉल हैंगिंग या हस्तकला माध्यमातून शिवरायांची प्रतिकृती साकारली आहे.
शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झाल्याने या विणकाराने आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवरायांना अभिवादन केले आहे.
या कारागिराला पैठणी शिवरायांची प्रतिकृती साकारण्याकरता तीन महिन्यांचा कालावधी लागला आहे.