Photos | पुणे रेल्वे स्थानकावर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरु, पाहा काय सुविधा मिळणार ?
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरु केले होते, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे रेस्टॉरंट रेल्वेच्या जुन्या कोचचा कल्पक वापर करून तयार करण्यात आले होते. सीएमएमटी स्थानकाच्या लांबपल्ल्यांच्या गाड्या सुटणाऱ्या प्लॅटफॉर्म क्रमांक 18 च्या समोर हे रेस्टॉरंट सुरु करण्यात आले आहे. येथे 10 टेबलसह 40 बसण्याची व्यवस्था आहे. मध्य रेल्वेने सीएसएमटी-मुंबई, नागपूर. चिंचवडनंतर विद्यानगरी पुणे येथे 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' सुरु केले आहे. चाकावरचे हे उपहारगृह पुणे विभागातील दुसरे रेस्टॉरंट आहे.