20 ऑगस्ट रोजी सोनम कपूरने गोंडस मुलाला जन्म दिला आहे सोशल मीडियावर सर्वांनीच कपूर आणि आहुजा कुटुंबीयांचे या छोट्या पाहुण्याच्या आगमनाचे अभिनंदन केले. आता रिया कपूरने हॉस्पिटलमधील मुलाचे काही फोटो शेअर केले आहेत.
20 ऑगस्ट रोजी सोनम कपूरने मुलाला जन्म दिला. आई आणि मुलगा पूर्णपणे निरोगी आहेत. सोनमने एक पोस्ट शेअर करून चाहत्यांसोबत आई झाल्याची गोड बातमी दिली आहे.
आता रिया कपूरने हॉस्पिटलमधील सोनम कपूरच्या मुलाचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती भावूक होताना दिसत आहे.
या फोटोमध्ये रिया कपूर आणि सोनम कपूर यांच्या मुलाशिवाय त्यांची आई सुनीता कपूर दिसत आहे. बाळाच्या आगमनाचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
जेव्हापासून सोनम कपूरने तिच्या गरोदरपणाची बातमी सांगितली तेव्हापासून कपूर कुटुंब सोनमच्या मुलाच्या आगमनाबद्दल खूप उत्सुक होते. अनिल कपूर देखील आजोबा होण्यासाठी खूप उत्सुक होते .