बिहार विधानसभा निवडणुकीतील निकाल येण्यास आता सुरुवात झाली आहे. त्यात महत्वाचा निकाल हाती आला आहे. तो म्हणजे RJDचे नेते आणि माजी मंत्री तेजप्रताप यादव यांचा.
तेजप्रताप यांनी हसनपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. मात्र, JDUचे उमेदवार आणि तेजप्रताप यादव यांचे सासरे चंद्रिका राय यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत जावयाचा विजय झाला पण सासरेबुवांना पराभवाचा सामना करावा लागला, अशी चर्चा आता सुरु आहे.
समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर मतदारसंघातून तेजप्रताप यादव हे सकाळी पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळालं होतं.
तेजप्रताप यांच्या विरोधात JDUचे राजकुमार राय यांनी निवडणूक लढवली. पण अखेर राय यांना पराभव पत्करावा लागला आहे.