टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माचा दिवस असेल, तर तो कुठल्याही गोलंदाजाची वाट लावू शकतो. त्याचा दिवस खराब करु शकतो. पण याच रोहित शर्माचे सध्या आयपीएल 2025 मध्ये 'बुरे दिन' सुरु आहेत.
रोहित शर्माचा संघर्ष सुरु आहे. त्याला आपल्याला लौकीकाला साजेशी कामगिरी करता येत नाहीय. रोहित शर्मा सध्या एका गोलंदाजामुळे खूप हैराण आहे.
आता प्रश्न हा आहे की, तो गोलंदाज कोण आहे?. आम्ही इथे कुठल्या खेळाडूबद्दल नाही, तर एका खास प्रकारच्या गोलंदाजाबद्दल बोलत आहोत.
रोहित शर्माला मागच्या 16 महिन्यांपासून या खास प्रकारच्या गोलंदाजाने हैराण करुन सोडलय. लेफ्ट आर्म म्हणजे डावखुऱ्या गोलंदाजांमुळे रोहित शर्मा त्रस्त आहे. रोहित शर्माचा डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध स्ट्रगल सुरु आहे.
RCB विरुद्ध 7 एप्रिलला सामना झाला. लेफ्ट आर्म पेस गोलंदाजाविरुद्ध रोहितची कमजोरी उघड झाली.
रोहित शर्माने RCB विरुद्ध चांगली सुरुवात केली होती. 1 सिक्स आणि दोन फोरच्या बळावर 9 चेंडूत 17 धावांवर खेळत होता. त्याचवेळी डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालने रोहितला डगआऊटमध्ये पाठवलं.
रोहित शर्माची लेफ्ट आर्म पेस बॉलरसमोर लाचार होण्याची ही पहिली वेळ नाहीय. 2024 पासून आतापर्यंत 12 वेळा लेफ्ट आर्म बॉलरच्या गोलंदाजीवर T20 मध्ये तो आऊट झालाय.
रोहित शर्मा वर्ष 2024 पासून आतापर्यंत 16 महिन्यात लेफ्ट आर्म पेसर विरोधात T20 मध्ये 26 इनिंग खेळलाय. यात 157 चेंडूंचा सामना करताना 249 धावा केल्या आहेत.
या दरम्यान त्याची बॅटिंग सरासरी 20.75 होती. 26 इनिंगमध्ये रोहित 12 वेळा लेफ्ट आर्म गोलंदाजी विरुद्ध आऊट झाला. याचाच अर्थ लेफ्ट आर्म पेसर रोहित शर्मासाठी मुख्य अडचण बनून राहिले आहेत.
IPL 2025 मध्ये रोहित शर्माने चार इनिंगमध्ये 38 धावा केल्या आहेत. म्हणजे एकाही इनिंगमध्ये त्याचा स्कोर 20 च्या पुढे गेलेला नाही. यंदाच्या सीजनमध्ये रोहितने चार इनिंगमध्ये 0, 8, 13 आणि17 इतक्याच धावा केल्या आहेत.