भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा खतरनाक अंदाजात बॅटींग करत आहे. विरोधी संघाच्या गोलंदाजांचा धुरळा उडवून टाकत आहे. रोहितने या धमाकेदार अंदाजात खेळत शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
रोहित शर्मा याने या वर्ल्ड कपमध्ये दमदार फलंदाजी करत भारताच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिक बजावली आहे. रोहित वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे.
रोहित शर्माने या वर्ल्ड कपमध्ये आठ सामन्यात 55 च्या सरासरीने 442 धावा केल्या आहेत. यामधील 332 धावा या चौकार आणि षटकारांच्या साहाय्याने केल्या आहेत.
भारताच्या इतिहासातील कोणत्याही खेळाडूने वर्ल्ड कपमध्ये 120 च्या स्ट्राईक रेटने 400 हून धावा केल्या नाहीत. रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे ज्याने 120 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
रोहित शर्माने इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या गेल्या विश्वचषकात एकूण 5 शतके झळकावली होती. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करणारा पहिला भारतीय आहे.