रोहित शेट्टी याचा काही दिवसांपूर्वीच सर्कस हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.
आता नुकताच रोहित शेट्टी हा सर्कस या चित्रपटाबद्दल बोलताना दिसला. रोहित शेट्टी म्हणाला की, मी नेहमीच चित्रपटांच्या यशाचा आणि अपयशाचा एकटा मालक आहे. जे आहे ते मी नेहमीच स्वीकारतो.
हा हे देखील खरे आहे की, सर्कसमध्ये काही चुका या झाल्या आहेत. मात्र, याला त्याला दोष देण्यामध्ये काहीच नसते. सर्कस या चित्रपटामध्ये रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत होता.
रोहित शेट्टी याचा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर अनेकांनी रणवीर सिंह याला टार्गेट करण्यास सुरूवात केली होती. गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत.
रोहित शेट्टी याने स्पष्ट केले की, सर्कस फ्लाॅप गेला म्हणून आम्ही परत येणार नाहीत असेही नाहीये. धमाकेदार चित्रपट घेऊन परत भेटीला येऊ असेही म्हणताना रोहित शेट्टी हा दिसला.