PHOTO | ‘पळस मैने’चा मालवणमध्ये किलबिलाट, हजारो किलोमीटरचे अंतर कापून आलेल्या या पक्ष्यांचे वैशिष्ट्य काय?

युरोप, मध्य आशिया, तुर्कस्तान भागातून हजारो किलोमीटरचे अंतर कापून हे पक्षी मालवण रेवतळे भागात दाखल झालेत. सकाळी आणि सायंकाळी आकाशात उडणाऱ्या या पाहुण्यांचे थवेच्या थवे रेवतळे परीसरात दिसून येत आहेत. (rosy starling bird sindhudurg tourist)

| Updated on: Mar 13, 2021 | 4:17 PM
सिंधुदुर्ग : युरोप, मध्य आशिया, तुर्कस्तान भागातून हजारो किलोमीटरचे अंतर कापून हे पक्षी मालवण रेवतळे भागात दाखल झालेत. सकाळी आणि सायंकाळी आकाशात उडणाऱ्या या पाहुण्यांचे थवेच्या थवे रेवतळे परीसरात दिसून येत आहेत. ‘रोझी स्टर्लिंग’ अर्थात पळस मैना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पाहुण्यांचा थाट काही औरच आहे.

1 / 5
मालवण रेवतळे परीसरात हे पक्षी विजेच्या तारांवर शेकडोच्या संख्येने बसलेले आढळतात. या  भागात मोठ्याप्रमाणात कांदळवन असल्याने हे पक्षी त्या ठिकाणी रात्रीच्या मुक्कामाला असतात. कीटक, फळे, फुलांमधील मध हे या पक्षांचं आवडतं खाद्य आहे. त्यांच्या येण्याची आणि पळस फुले बहरण्याची वेळ एकच असल्याने या पक्ष्याला ‘पळस मैना’ असेदेखील म्हणतात.

2 / 5
रोझी स्टर्लिंग अर्थात पळस मैना पक्ष्याचे डोके आणि मान काळीभोर असते. गळा आणि पोट चमकदार गुलाबी असून पाठीवर पांढरी-गुलाबी झालर असते. या पक्षांच्या डोक्‍यावर मध्यभागी आकर्षक तुरा असतो नर व मादी सारखेच असून मादीचा तुरा थोडा आखूड असतो. दक्षिण भारतात यांना "मधुसारिका' असेही म्हटलं जात.

3 / 5
यांचे समूहनृत्य विहंगम असते. फुलझाडांकडे आकर्षित होणारे हे पक्षी सध्या मालवणात स्थिरावले आहेत. रेडी रेवस या सागरी महामार्गालगत असलेल्या विजेच्या तारांवर दररोज सकाळी आणि संध्याकाळी हजारो पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. ठरलेल्या वेळेतच हे पक्षी एकत्र येऊन हवाई कसरत करतात. हे विलोभनीय दृश्य सर्वांना थक्क करणारं असतं.

4 / 5
पंधरा वीस मिनिटांच्या कसरतीनंतर झाडांवर विसावून दहा मिनिटे एकच कलकलाट करीत अंधार दाटून आला की हे पक्षी एकदम चिडीचूप होतात. पुन्हा पहाटे सूर्योदयाबरोबर हे पक्षी हवेत घोंगावत सर्वांचे लक्ष वेधून घेतात. नंतर अन्नाच्या शोधात सर्व दिशेने विखरून जातात. सध्या या परदेशी पाहूण्यांना पाहण्यासाठी मालवण रेवतळे परीसरात पर्यटकांसोबतच स्थानिक लोकही आवर्जून येथे भेट देत आहेत.

5 / 5
Follow us
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...