झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अवॉर्ड्स’.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीनं हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगला.
यावर्षी माझा होशील ना, येऊ कशी तशी मी नांदायला, देवमाणूस, अग्गबाई सासूबाई, काय घडलं त्या रात्री?, कारभारी लाईभारी, लाडाची मी लेक ग! या मालिकांमध्ये टफ फाइट बघायला मिळणार आहे.
आता प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आणि कलाकार कोण? हे 28 तारखेलाच कळेल.
लाडाची लेक अर्थात मिताली मयेकरनं या सोहळ्यात खास लक्ष वेधून घेतलं.
मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे या बहिणींनी हटके अंदाजात हजेरी लावली.