वसंत पंचमी (Vasant Panchami) हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा विशेष दिवस देवी सरस्वतीला (Saraswati)समर्पित आहे. या दिवशी, भक्त विशेषतः विद्या आणि बुद्धीची देवी सरस्वतीची पूजा करतात आणि प्रार्थना करतात .
हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो. इतकेच नव्हे तर सहाही ऋतूंमध्ये वसंत ऋतु हा ऋतुराज म्हणून ओळखला जातो. यावर्षी 2022 मध्ये वसंत पंचमी आज 5 फेब्रुवारी, शनिवारी साजरी केली जाणार आहे.
वसंत पंचमी च्या मुहूर्तावर होणाऱ्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी मंदिर वेगवेगळ्या फुलांनी सजवण्यात आलं आहे.
36 प्रकारच्या सात टन फुलांची आकर्षक अशी सजावट आज मंदिरात करण्यात आले आहे. ही सजावट पुणे येथील श्री विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी केली आहे.
विशेष म्हणजे देवाला आज पांढऱ्या रंगाचे वस्त्र आणि रुक्मिणीमातेला पांढऱ्या रंगाची रेश्मी साडी परिधान केली असल्याने देवाचे रुप अधिकच खुलुन दिसत आहे.