Russia Ukraine Crisis: युक्रेनमधील लोकांची स्थिती काय आहे? फोटोतून भीषण वास्तव समोर

| Updated on: Feb 24, 2022 | 12:32 PM

Russia Ukraine Crisis: सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून रशियाचं सैन्य युक्रेन सीमेच्या 20 मैल उत्तरेत सक्रिय असल्याचं स्पष्ट झालं आहे. मॅक्सर तंत्रज्ञानाच्या मदतीनं ही इमेज समोर आली असून पीटिआयनं याबाबतचं वृत्त दलंय.

1 / 6
युक्रेनमधील सैनिकाचा हा फोटो समोर आला असून यामध्ये सैनिक एका गाडीच्या डिकीमधून काही सामान बाहेर काढताना दिसतोय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्मादिर पुतिन यांनी मिलिटरी ऍक्शनचा आदेश दिल्यानंतर युक्रेनमधील सैन्यही सज्ज झालं असून परिस्थिती आता आणखी चिघळू लागली आहे. (Photo Source - PTI)

2 / 6
सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून रशियाचं सैन्य युक्रेन सीमेच्या 20 मैल उत्तरेत सक्रिय असल्याचं स्पष्ट झालं आहे. मॅक्सर तंत्रज्ञानाच्या मदतीनं ही इमेज समोर आली असून पीटिआयनं याबाबतचं वृत्त दिलंय. (Photo Source - PTI)

3 / 6
पूर्व युक्रेनमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. लोकांचं प्रचंड नुकसान झालं असून रशियानं केलेल्या हल्ल्यात अनेकांच घर नेस्तनाबूत झालंय. रशिया आणि उक्रेनमध्ये ताणलेल्या संसर्घात सर्वसामान्य जनता भरडून निघाली आहे. (Photo Source - PTI)

4 / 6
सॅटेलाईट इमेजमध्ये सैन्यदल दक्षिणेकडून दुसरीकडे जात असल्याचं दिसून आलं आहे. 23 फेब्रुवारीला मॅक्सर तंत्रज्ञानाच्या मदतीनं हा फोटो काढण्यात आला आहे. रशियन सैन्य आपला ताफा दुसरीकडे हलवत असल्याचं यात दिसतंय. (Photo Source - PTI)

5 / 6
युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे युक्रेनमधील सैन्यही सज्ज झालंय. अशातच पीटीआयनं जारी केलेल्या एका फोटोमध्ये, याच तणावात दोन सैनिक आपलं जेवण करत असल्याचं दिसून आलंय. रशियानं युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरांवर मिसाईलहा हल्ला केलाय. यात मोठं नुकसान झालं असण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. दरम्यान, युद्धजन्य परिस्थिमुळे जागतिक बाजारपेठेवरही या सगळ्या घडामोडींची पडसाद उमटू लागले आहेत. (Photo Source - PTI)

6 / 6
युक्रेनमध्ये आणिबाणीची घोषणा केल्यानंतर नागरिकांनी तातडीनं आपल्या गाड्यांमध्ये इंधन भरण्यासाठी गर्दी केली. वाहनांच्या मोठ्या रांगा या इंधन भरण्यासाठी लागल्याचं यावेळी दिसून आलं आहे. युक्रेन आणि रशियात ताणलेल्या संबंधांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड तणाव पाहायला मिळतोय. (Photo Source - PTI)