क्रिकेटच्या देवाकडून बॅट आणि बॉलचं पूजन अन् आईचा आशिर्वादा, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
आज विजयदशमी दसरा आहे, त्यामुळे लोक दसरा हा मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसत आहेत. दसऱ्याच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या घरातील लक्ष्मीची पूजा करतात. तसेच आपल्या घरातील हत्यारे असतील, गाड्या असतील अशा गोष्टींची पूजा केली जाते. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने देखील आपल्या घरी पूजा करत चाहत्यांना दसऱ्याच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरने त्याच्या घरी केलेल्या पूजेने सर्वांचाच लक्ष वेधलं आहे.
Most Read Stories