छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘माझा होशिल ना’ (Majha Hoshil Na) ही सध्या चांगलीच गाजते आहे.
सध्या तुमचे लाडके कलाकार अर्थात सई आणि आदित्या हनिमूनला गेले आहेत. मनालीमध्ये दोघं धमाल करताना दिसत आहेत.
विराजस कुलकर्णी म्हणजेच आदित्यने या ट्रीपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
झी मराठी अवॉर्ड्समधे सर्वोत्कृष्ट मालिकेसह सर्वाधिक पुरस्कार पटकवलेल्या या मालिकेत आता ‘जे डी’ या नव्या पात्राचं आगमन होणार आहे.
आदित्य कश्यपच्या आई-वडीलांचा मारेकरी आणि आदित्यचा सख्खा काका ‘जयवंत देसाई’ ऊर्फ ‘जे डी’ हा आता अनेक वर्षांनी मुंबईत परतणार आहे. त्याच्या येण्यामुळे मालिकेत एक मोठा ट्वीस्ट येणार आहे .