‘मराठी बिग बॉस’ फेम आणि अभिनेत्री सई लोकूर सध्या नवनवीन लूक्समध्ये चाहत्यांशी कनेक्ट होतेय.
कलर्स मराठी वाहिनीचा ‘मराठी बिग बॉस’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. मराठी बिग बॉसचे पहिले पर्व, त्यातील स्पर्धकांमुळे खूपच चर्चेत आले होते. त्यातील एक स्पर्धक अभिनेत्री सई लोकूर हिनेदेखील या कार्यक्रमातून स्वत:चा असा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे.
स्पर्धेदरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात तिची मेघा धाडे, पुष्कर जोग यांच्यासोबत असलेली मैत्री देखील चांगलीच गाजली होती. विशेषतः सई लोकूर आणि पुष्कर जोग यांच्या मैत्रीची चर्चा बिग बॉसच्या घराबाहेर देखील चांगलीच रंगली होती.
सध्या सई गोव्यात धमाल करत आहे. या ट्रीपचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. सोबतच तिचा हा लूक परफेक्ट बीच लूक देतोय.