अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. गेले अनेक दिवस ती नवनवीन फोटोशूट तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे.
आता तिनं एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
महत्त्वाचं म्हणजे सईनं हे फोटोशूट मस्त साडी परिधान करुन केलं आहे.
'साडी और सादगी के संग संग ..' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सईची ही ग्रे रंगाची साडी प्रचंड स्टायलिश आहे, सोबतच तिनं या साडीवर डिझायनर ब्लाऊज कॅरी केलं आहे.