बॉलिवूड अभिनेता सलमान खान आज आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमाननं आधीच सांगितलं होतं की तो यावर्षी त्याचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीनं साजरा करणार आहे. तसेच त्यानं आपल्या चाहत्यांना वाढदिवसानिमित्त घराबाहेर गर्दी न करण्याची विनंती केली. बिग बॉसनं त्याचा खास दिवस अतिशय खास पद्धतीनं साजरा केला. बिग बॉसच्या स्टेजवर सलमान खानचा वाढदिवस खूपच सुंदर पद्धतीनं साजरा करण्यात आला.
रविना टंडन आणि जॅकलिन फर्नांडिस या रविवारी वीकेंड वॉर एपिसोडमध्ये दिसणार आहेत. बिग बॉसच्या स्टेजवर सलमाननं या सगळ्यांसोबत वाढदिवसाचा केक कापला.
बिग बॉसची माजी स्पर्धक आणि सलमानची आवडती शहनाज गिलही या कार्यक्रमात दिसली. शहनाजनं सलमानबरोबर खूप प्रेमानं डान्स केला आणि तिच्या स्टाईलमध्ये तिनं सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यापूर्वी शनिवारी सलमान खाननं आपल्या पनवेलमधील फार्महाऊसच्या बाहेर फोटोग्राफर्स आणि पत्रकारांसह केक कापला. सलमान त्याच्या अंतिम चित्रपटातील लूकमध्ये दिसला.
सलमाननं लाइट ब्लू रंगाच्या शर्टसह ब्लू डेनिम परिधान केला होता.